NCP MLA Jitendra Awhad | ‘…म्हणून ते ट्विट डिलीट केले’, स्पष्टीकरण देताना जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला, म्हणाले-‘तुम करो तो रास लीला, हम करे तो…’

NCP MLA Jitendra Awhad | ncp jitendra awhad tweet on aurangjeb controversy chandrashekhar bawankule bjp

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  –  मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) आणि भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी बावनकुळे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) यांचा एक फोटो ट्विट केला होता. यावर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत आव्हाडांना टोला लगावला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देताना भाजपला टोला लगावला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे वाद?

दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये बावनकुळे यांनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी याच मुद्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केलेल्या ट्विटची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो ट्विट करुन ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ असा खोचक टोला लगावला होता.

 

आव्हाडांच्या ट्विटवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा दावा खोडून काढला. जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबजी यांच्या कबरीवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट केली. जे.पी. नड्डा, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्ग्यावर गेलो. तिथल्या मुस्लीम परिवारांनीही आमच्यासह दर्शन घेतले. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं? ते भूगोल विसरलेत का? ते म्हणतात औरंगजेबाच्या थडग्याचं दर्शन घेतलं. इतका नीचपणा? असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

म्हणून ते ट्विट डिलीट केलं-आव्हाड

यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ते ट्विट डिलीट केलं. त्यावरुन भाजपकडून खोचक टीका सुरु होताच त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही दर्ग्यावर गेलो की आम्ही मुसलमान धर्जिण… मग ‘जीतुदिन’ ‘हा हिंदु द्वेष्टा’ म्हणायचं. घाणेरडे फोटो, घाणेरड्या पोस्ट टाकायच्या. ‘औरंगजेबजी’वरुन किती धावपळ? आम्ही बोललो तर बाप रे बाप… मला माहीत आहे ती संतांची मझार आहे.. पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते, असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हम करे तो कॅरॅक्टर ढीला…

जितेंद्र आव्हड यांनी आणखी एक ट्विट करुन भाजपला टोला लगावला आहे.
जो तुम करते हो… वो हम भी कर सकते हैं… लेकिन हम करते नहीं है…तुम करो तो रास लीला,
हम करे तो कॅरॅक्टर ढीला, दो उडतें तीर से इतने घायल, कभी मिलोगे तो हमारे जखमो के अनगीनत निशान
देख लेना, अशा प्रकारे शेरच्या माध्यमातून त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

 

 

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | ncp jitendra awhad tweet on aurangjeb controversy chandrashekhar bawankule bjp

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला परभणीत मोठा धक्का! एवढ्या नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | ‘त्या’ विधानाबाबत गिरीश महाजन यांनी मागितली माफी, म्हणाले- ‘तो उल्लेख अनावधानाने झाला’

Pune Crime News | शहरातील प्रसिद्ध सनदी लेखपालाकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, लातूर जिल्हयातील युवकास पुण्यात अटक