Maharashtra Politics | नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला परभणीत मोठा धक्का! एवढ्या नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics | uddhav thackeray shivsena ncp mim 30 corporators join eknath shinde camp balasahebanchi shivsena

परभणी : बहुजननामा ऑनलाईन Maharashtra Politics | अगदी काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर लगेचच शिवसेनेच्या ठाकरे गटातील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच काहीसे चित्र परभणीत देखील पहायला मिळाले. परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्षातील नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविचारानुसार मार्गक्रमण करत असताना सध्या अनेक लोक पक्षाला येवून जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो.’ असे याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Maharashtra Politics)

 

 

तसेच, ‘राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी, कामगार अशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू.’ असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना दिला. (Maharashtra Politics)

 

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार शिवाजीराव जाधव, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच परभणी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर जाणार असून यात ते
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. हा दौरा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या
नाशिक दौऱ्याआधी कार्यकर्त्यांच्या गाठी – भेटी घेण्यासाठी योजिल्याचे बोलले जात आहे.
पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्याअगोदर शिंदे गटाने दिलेला हा मोठा धक्का
असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)

 

Web Title :- Maharashtra Politics | uddhav thackeray shivsena ncp mim 30 corporators join eknath shinde camp balasahebanchi shivsena

 

हे देखील वाचा :

Girish Mahajan | ‘त्या’ विधानाबाबत गिरीश महाजन यांनी मागितली माफी, म्हणाले- ‘तो उल्लेख अनावधानाने झाला’

Sushma Andhare | सुषमा अंधारेंच्या स्वतः बद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ…

Ajit Pawar | ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम, तुम्हाला वाटत असेल तर गुन्हा दाखल करा, पण…’, अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर