पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सोशल मीडियावर (Social Media) आपली किती माहिती द्यावी, हे आता काळजीचे कारण होऊ लागले आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर आपल्या मुलांविषयीची टाकलेली माहिती घेऊन एका व्हाईट कॉलर गुन्हेगाराने (White Collar Criminals) शहरातील प्रसिद्ध सनदी लेखापालाला ३० लाख रुपयांची खंडणीची (Extortion Case) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पोलिस पथकाने (Pune Police) किरण रामदास बिरादार Kiran Ramdas Biradar (वय २४, रा. मांजरी, पो. आवडकोंडा, ता. उदगीर, जि. लातूर) याला अटक केली आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी मुकुंदनगरमध्ये (Mukund Nagar, Pune) राहणार्या एका ५२ वर्षाच्या सनदी लेखपालाने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण बिरादार बीएस्सी झालेला आहे. तो फेसबुक व इतर सोशल मीडियावरुन व्यावसायिकांची माहिती घेतो. ही माहिती मिळाल्यावर त्यांचा नंबर मिळवून त्यांच्याकडे खंडणी मागतो. फिर्यादी यांचा मुलगा कोलकत्ता येथे शिकायला असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकले होते. त्यावरुन त्याने फिर्यादींचा फोन नंबर मिळविला. त्यांना व्हॉटसअप कॉल (WhatsApp Call) केला. त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितली. माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कोलकत्ता येथे असलेल्या मुलाला ठार करीन अशा धमकीचे मेसेज पाठविले.
फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाला याची माहिती दिली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार फिर्यादी त्याला पैसे देण्यास तयार झाले.
त्यांनी १० लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या.
त्याने सांगितल्याप्रमाणे डेक्कन येथील गरवारे पुलाखालील झुडपात पैशांची बॅग ठेवण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बॅग ठेवली. पोलिसांनी आजू बाजूला सापळा लावला होता.
बॅग घेण्यासाठी तो आल्याबरोबर पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले.
अशाच प्रकारे त्याने आणखी कोणाकडून पैसे उकळले आहेत का याचा तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Extortion demand of 30 lakhs from the famous Chartered Accountant in the city, youth from Latur district arrested in Pune
हे देखील वाचा :
Gold-Silver Rate Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या आजचे दर
Pune Crime News | वारजे माळवाडीतील पप्या उकरे टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई