Girish Mahajan | ‘त्या’ विधानाबाबत गिरीश महाजन यांनी मागितली माफी, म्हणाले- ‘तो उल्लेख अनावधानाने झाला’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महापुरुषांवर करण्यात आलेल्या विधानांवरुन राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान भाजपचे नेते (BJP) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा एकेरी उल्लेख केल्याचे लक्षात येताच माफी मागितली आहे. माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याचा काहीही उद्देश नव्हता, माझ्याकडून तसा उल्लेख झाल्याने मी माफी मागतो, असे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले गिरीश महाजन?
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनावधानाने झाला. वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आल्यानंतर हे लक्षात आलं की मी अनावधानाने उल्लेख केला. मी जाणीवपूर्वक असा उल्लेख करण्याचा काही प्रश्नच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थान आहेत. माझ्याही मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे या विषयाचं राजकारण कुणीही करु नये असं गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.
युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या नावावर असलेल्या क्रिडा पुरस्काराचा उल्लेख क्रिडामंत्री गिरीश महाजन "शिवाजी पुरस्कार"असा एकेरी करतात तर दुसरीकडे बावनकुळेजी औरंग्याला जावयाप्रमाणे औरंगजेबजी म्हणतात.भाजपची लोक वेडी झाली आहेत. यांच्यासाठी एखादा पागलखानाच काढावा लागेल.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2023
एका पुरस्कार सोहळ्यामध्ये गिरीश महाजन यांनी ‘शिवाजी अवॉर्ड’ विजेता असा उल्लेख केला. गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर महाजन यांनी स्पष्टीकरण देऊन माफी मागितली. श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या कार्य़क्रमात हा उल्लेख त्यांच्याकडून झाला होता. परंतु आपण जाणीवपूर्क असं केलेलं नाही असेही महाजन यांनी म्हटले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राष्ट्रवादीकडून महाजनांवर टीकास्त्र
दरम्यान, गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मिटकरी म्हणाले ‘युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या नावावर असलेल्या क्रिडा पुरस्काराचा उल्लेख क्रिडामंत्री
गिरीश महाजन “शिवाजी पुरस्कार” असा एकेरी करतात तर दुसरीकडे बावनकुळेजी औरंग्याला जावयाप्रमाणे
औरंगजेबजी म्हणतात. भाजपची लोक वेडी झाली आहेत. यांच्यासाठी एखादा पागलखानाच काढावा लागेल,
असा टोला मिटकरी यांनी लगावला.
Web Title :- Girish Mahajan | singular mention of chhatrapati shivaji maharaj was unintentional minister girish mahajan apologized
हे देखील वाचा :
Sushma Andhare | सुषमा अंधारेंच्या स्वतः बद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ…
Pune Crime News | शहरातील प्रसिद्ध सनदी लेखपालाकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, लातूर जिल्हयातील युवकास पुण्यात अटक
Ajit Pawar | ‘मी माझ्या भूमिकेवर ठाम, तुम्हाला वाटत असेल तर गुन्हा दाखल करा, पण…’, अजित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
Comments are closed.