बहुजननामा ऑनलाईन टीम : अनेक दिवसांपासून लांबणीला लागलेला सत्ता स्थापनेचा प्रश्न आता सुटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. काल झालेली बैठक सत्ता स्थापनेसाठी साकारत्मकता दाखविणारी ठरली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे समजले आहे.
या यादीमध्ये मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे एकूण १५ मंत्री त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भूजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आता लवकरच मंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्यार असल्याचे समजले आहे.
राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाचा वाटा मिळणार का ?
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जागांमध्ये खूप फरक नाही त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी विचारपुस केली जात असल्याचे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. या सत्ता स्थापनेसाठी ५०-५० फॉर्मुला ठरला असून मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दुसऱ्या टर्मसाठी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे येणार असल्याचे समजत आहे. जर हा फॉर्मुला यशस्वी ठरला तर तब्बल वीस वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे देखील सांगण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com