नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे नेहमीच आपल्या मिश्किल शब्दात चारोळ्यांच्या मार्फत विरोधावर टीका करतात आज दिंडोरी मतदारसंघातील पिंपळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी काही काव्यात्मक टीका केली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला .मोदी घटनास्थळी येण्यापूर्वी अनेक नेत्यांची भाषणे झाली. यावेळी रामदास आठवले यांचेही भाषण झाले. नेहमी वेगळ्या शैलीत भाषण देण्यात पटाईत असलेले आठवलेंनी यावेळीही कविता करत मोदींची स्तुती केली. तसेच काही घोषणाही त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या.
नरेंद्र मोदी चौकीदार, राहुल गांधी भागीदार;
नरेंद्र मोदी विकासपुरुष, राहुल गांधी भकासपुरुष;
नरेंद्र मोदी फकीर हैं, राहुल गांधी अमीरो की लकीर हैं;
आमच्याकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आहे जंत्री,म्हणून मोदी होणार पुन्हा प्रधानमंत्री…
असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले. या त्यांच्या प्रत्येक काव्यपंक्तीला त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,महादेव जाणकार आदी उपस्थित होते .