नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण नेते किंवा इतर महत्वाच्या लोकांच्या संरक्षणाखाली तैनात असतांना सैनिक पाहिले असेलच पण आपण कधीही पाहिले असेल की एखाद्या प्राण्याची सुरक्षा सशस्त्र सैनिक करतात. परंतु, श्रीलंकेत एका हत्तीला अशी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या हत्तीचे नाव नंडुनगमुवा राजा आहे ज्याची उंची सुमारे १०.५ फूट आहे. श्रीलंकेतील हा सर्वात मोठा पाळीव हत्ती आहे. ज्याचे वय ६५ वर्ष झाले आहे.
श्रीलंकेतील पारंपरिक उत्सवादरम्यान तो तेथील रस्त्यावरून जात असल्याने त्याच्या जीवाला कुठली हानी पोहचू नये म्हणून श्रीलंकेतील सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी सैन्याच्या एका तुकडीची नेमणूक करण्यात आली आहे.
नंडुनगमुवा हत्तीच्या सुरक्षेबाबत, त्याचे मालक म्हणाले की, सन २०१५ मध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान या हत्तीची एका दुचाकीस्वराशी टक्कर होता होता वाचली होती. यामुळे सरकारने याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या हत्तीला सुरक्षा पुरवण्याचे आदेश आहे. दरम्यान, गौतम बुद्ध यांचे अवशेष असलेल्या पेटाऱ्याच्या रॅली दरम्यान, या हत्तीला प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या कार्यक्रमात सुमारे १०० हत्ती सहभागी होतात.
Visit : bahujannama.com