नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) होणाऱ्या चौकशीवरुन सध्या राज्यात वातावरण तापले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांची पाठराखण करताना राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की , सरकारकडून लक्ष्य केलेले शरद पवार हे विरोधी पक्षाचे नवे नेते आहेत. महाराष्ट्रात निवडणूकीच्या एक महिन्यापूर्वी अशी कारवाई होणे ही राजकीय हेव्यादाव्यांची संधी साधण्याची (राजकीय संधिवात ) कृती आहे.
Sharad Pawar Ji is the latest Opposition leader to be targeted by a vindictive Government. The timing of this action, a month before elections in Maharashtra, reeks of political opportunism. https://t.co/XCW0GsdXjj
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 27, 2019
शिवसेनेचंही शरद पवारांना समर्थन
दरम्यान रम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की , शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केलं आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे असंच मी म्हणेन. या घोटाळ्यावरुन विधानसभेत चर्चा झाली होती तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. ईडी आज देवापेक्षाही मोठी झालं आहे ?
Visit : bahujannama.com