औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करीत त्याला जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडल्याची घटना औरंगाबाद शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगराता घडली. इम्रान पटेल (वय-28) असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान पटेल हा शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास तो कामावरून घरी परत निघाला होता. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता अचानक त्याला 8 ते 10 तरुणांच्या टोळक्याने अडवत त्याच्या दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. याचवेळी त्याला जय श्रीराम म्हणण्यासही भाग पाडले. त्यावेळी इम्रान तीन वेळा जय श्रीराम म्हटले. टोळके इम्रानला मारहाण करत असताना एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली. ही घटना सर्वत्र पसरल्याने एमआयएमचे कार्यकर्ते पोलीस चौकीत जमा झाले होते. पोलीसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra: A man allegedly beaten up for refusing to chant "Jai Shri Ram" in Aurangabad. Madhukar Sawant, Police Inspector, Begampura, says, “Complaint received. Facts will be revealed after investigation completes." pic.twitter.com/Lpe0Cdlpru
— ANI (@ANI) July 19, 2019