पुणे : बहुजननामा ऑनलाइन – हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याच्या रागातून युवकावर खुनी हल्ला झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सुमीत बाबर (वय ३६, रा़ कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी झाले़ कोंढवा भागात चेतन तुपे यांना अधिक मताधिक्य मिळाले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्याचा संशय घेऊन २० ते २५ जणांनी सुमित बाबर याच्यावर हल्ला केला़ त्याच्या डोक्यात, हातावर वार केले़ जखमी अवस्थेत तो रस्त्यावर पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले़ सुमीत बाबर याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्याच्या डोक्यावर १७ टाके घालण्यात आले आहे़ त्याचा हातही फॅक्चर झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले असून ते घटनेची माहिती घेत आहेत.