मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आज सकाळी अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करून शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केला. निवडणुकीत यश मिळवल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आज कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकीत मनसेने सहकार्य केल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कोल्हेंनी ठाकरे यांची भेट घेतील. मात्र, त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कोल्हे यांच्या भेटीचा नेमका काय विषय होता यावर तर्कवितर्क काढले जात आहेत.
फक्त धन्यवाद म्हटले : कोल्हे
कसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांचा आपल्याला फायदा झाला. त्यामुळे त्यांचे आभार मान्यासाठी आज त्यांची भेट घेतली. आमच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. या भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.