चामराजनगर : वृत्तसंस्था – देशात याआधी मॉब लिंचिंगचे प्रकार घडले असतानाच आता कर्नाटकामध्ये दलित अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवल्याचा प्रकार समोर आलाय .हा दलित तरुण देवाच्या मूर्तीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे .
एक पुजाऱ्याने त्यासंदर्भातील वृत्त सांगितले कि, एक तरुण मंदिरात आला मी त्याला पाणी देऊ केले पण त्याने मंदिरात येण्याचा आग्रह केला. मी त्याला बोलावले असता त्याने माझी कॉलर पकडली. कारण नसताना मला शिवीगाळ करू लागला. असं वाटत होतं की, त्याची मानसिक परिस्थिती ठीक नाही. तो मंदिरात आला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्याला कपडे देऊ केले परंतु त्याच्या भावाने आणि ग्रामस्थांनी त्याला नग्नावस्थेत फिरवल्याचं म्हटलं आहे.
पिडीताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, ३९५, ३२३, ३४२,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस करत आहेत.