ठाणे न्यूज : वृत्त संस्था – Mumbai-Nashik Highway |टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं दुभाजकाला जाऊन धडकून अपघात ( tomatoes truck accident) झाला. हा अपघात ठाण्यातील (Thane) मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) शुक्रवारी पहाटे झाला. या अपघातामुळे ट्रकमधील तब्बल 20 टन टोमॅटो रस्त्यावर पडले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली होती. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) वाहतूक तब्बल 5 तास ठप्प होती.
महामार्गावर टोमॅटोचा खच
हा अपघात शुक्रवारी (दि.16) पहाटे दोनच्या सुमारास झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रक महामार्गाच्या मधोमध उलटल्याने ट्रकमधील 20 टन टोमॅटो महामार्गावर पडले.
त्यामुळे महामार्गावर टोमॅटोचा खच पडला होता.
यामुळे अनेक किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
https://twitter.com/ANI/
–
सकाळी 8 वाजता वाहतूक सुरळीत
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक आणि टोमॅटो बाजूला करण्यात आले.
सकाळी 8 च्या सुमारास महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
हा ट्रक के.व्ही गिरीश यांच्या मालकीचा आहे.
रात्री ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला जाऊन धडकून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अपघात ग्रस्त ट्रमधील टोमॅटो महामार्गावर पडल्याने हे टोमॅटो जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. मात्र, या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची नासाडी झाली आहे.
या अपघतामुळे मोठा आर्थिक फटका संबंधित शेतकऱ्यांना बसला आहे.
Web Title : Mumbai-Nashik Highway |tomato truck accident on mumbai nashik highway 20 tons of tomatoes fell on road thane.
Surekha Sikri Passes Away | ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन
Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच ! पुण्यात सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार