बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबईमध्ये वाऱ्यासोबत पाऊस सुरूच आहे. आता हवामान विभागाने शुक्रवारी म्हणजे आज मुंबईमध्ये हायटाइड अलर्ट जारी केला आहे. रिपोर्टनुसार, मुंबईमध्ये हायटाइड दरम्यान समुद्राच्या लाटा 4.75 मीटर उंचीपर्यंत जाऊ शकतात. माहितीनुसार, मुंबई मध्ये आज 1:33 वाजता हाय टाइड येऊ शकतो. हवामान विभाग आणि पोलीस यांची नजर या घटनेवर असणार आहे.
हायटाइड दरम्यान लोकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत समुद्रकाठच्या लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुंबईसोबतच महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात 23 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान मुंबईमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडी चे डायरेक्टर के एस होसलीकर म्हणाले, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. आणि तापमानात देखील घट झाली आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की, शहरात पावसासोबतच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
गुरुवारी हवामान खात्याच्या संताक्रूज वेधशाळेने कमाल तापमान 30.2 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 23.2 डिग्री सेल्सियस इतके वर्तवले होते.