बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आणि लॉकडाऊनमुळे शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अजूनही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. पण विद्यार्थ्यांच नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. भारतात आजही 60 टक्के भाग हा ग्रामीण असल्याने या ठिकाणी अद्यापही मोबाइलचे नेटवर्क पोहचलेले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार ही तरुणी ऑनलाईन अभ्यासासाठी गावातील जंगलात झोपडीत ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरवत आहे. 12 नंतर गावातून पशुवैद्यकीय पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली. मुंबईतील दिवा भागात भावांसोबत ती रहात होती. मात्र, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ती गावी आहे. गावात आल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाला. तीचं दारिस्ते गाव तसं दुर्गम खेडेगाव असलेला भाग. ऑनलाईन अभ्यास सुरु झाल्याने गावात इंटरनेट मिळत नसल्याने आजूबाजूला, डोंगरात तिने इंटरनेट कुठे मिळत का ? याचा शोध घेतला. तिला जंगलात इंटरनेट मिळालं. सध्या तिचा अभ्यास करतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
देव प्रकाश मीना यांनी या मुलीचा फोटो ट्विट केला आहे. क्लास अटेंन्ड करण्यासाठी ही मुली रोज आपल्या गावापासून दूर जंगलात जाते. सकाळी सात ते संध्याकाळी सात तब्बल 12 तास ती जंगलात एकटीच अभ्यास करुन पुन्हा आपल्या घरी परत येते. यावेळी येणारी ऊन-पाऊस संकट आणि इतर गोष्टींचा विचार करुन चार भावांनी तिच्यासाठी जंगलात एक छोटं घर वजा खोपटं उभं केलं. इथे 12 तास बसून ती अभ्यास करते. या मुलीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी या मुलीच्या धाडसाचं आणि शिक्षणाच्या जिद्दीचं खूप कौतुक केलं आहे. याच बरोबर सरकारच्या अपुऱ्या पडणाऱ्या सोयींसुविधांवरही टीका केली आहे. कोरोनाच्या काळात आजही अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, तिची तळमळ पाहून आमदार नीतेश राणे यांनी तिच्या वसतिगृहाचा खर्च उचलण्याची हमी दिली आहे.
https://twitter.com/DevprakashIRS/status/1296108211653636096
https://twitter.com/DevprakashIRS/status/1296108211653636096
https://twitter.com/DevprakashIRS/status/1296108211653636096