मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पाण्याचं बिल थकल्यास मुंबई महानगरपालिका सामन्य मुंबईकरांवर कडक कारवाई करते. अनेकदा पाणीही बंद केलं जातं मात्र मुंबई महानगरपालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याचा समावेश दिवाळखोर यादीत केला आहे. पाण्याचं बिल थकवण्यात आल्यानं पालिकेनं वर्षा बंगल्याचा समावेश डिफॉल्टर यादीत केला असून लाखो रुपयांचे बिल थकलं असल्याचं माहिती अधिकारातून (RTI) उघड झालं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचं बिल थकलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीदेखील पाण्याचं बिल थकवलं आहे. यामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी पाण्याचं बिल भरलेलं नाही. या बिलाची एकूण रक्कम ८ कोटींच्या घरात जाते. यामुळे मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर एवढी मेहरबान का? असा प्रश्न उपस्थि केला जात आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागावली होती. त्यात ही माहिती उजेडात आली आहे.
कोणी किती रुपयांचं बिल थकवलं ?
१)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : वर्षा निवासस्थान
एकूण थकबाकी ७ लाख ४४ हजार, ९८१ रूपये
२)सुधीर मुनगंटीवार : अर्थमंत्री, देवगिरी निवासस्थान
थकबाकी- १ लाख ६१ हजार ५५ रुपये
३)विनोद तावडे : सांस्कृतिक मंत्री, सेवासदन निवासस्थान
थकबाकी- १ लाख ६१ हजार, ७१९ रुपये
४)पंकजा मुंडे : महिला आणि बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान
थकबाकी ३५ हजार ३३ रुपये
५)दिवाकर रावते : परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान
थकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये
६)सुभाष देसाई : उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान
थकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये
७)एकनाथ शिंदे : सार्वजनिक बांधकाम, नंदनवन निवासस्थान
थकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये
८)चंद्रशेखर बावनकुळे : उर्जामंत्री, जेतवन निवासस्थान
थकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये
९)महादेव जानकर : शुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी निवासस्थान
थकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये
१०)ज्ञानेश्वरी निवासस्थान
थकबाकी ५९ हजार ७७८ रुपये
११)सह्याद्री अतिथीगृह
थकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये