नवी दिल्ला : वृत्तसंस्था – जय श्रीराम न म्हटल्याने वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा रोहिणीतील एका मौलवीने केला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घडली असल्याचे त्यांनी सांगितले.
मोलाना मोमीन (वय ४०) असे मौलवीचे नाव आहे. हे मौलवी सेक्टर -४० मध्ये एका मदरशामध्ये अध्यापन करतात.
काय आहे मोमीन यांचा दावा ?
मौलाना मोमीन हे गुरुवारी सायंकाळी मशीदीच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून एक कार आली. त्या कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर कारमधील तिघे खाली उतरले. त्यांनी विचारपूस केल्यावर मौलवी म्हणाले की, अल्लाह की कृपा से अच्छा हॅं त्यानंतर तिघांनी यावर आक्षेप घेत त्याना जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. त्यानंतर नकार देत ते मशिदीच्या दिशेने निघाले. त्यानंतर एका वाहनाने त्यांना धडक मारली आणि ते बेशुद्ध झाले. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. त्याच्या डोक्यासह चेहरा आणि हाताला मार लागला आहे.
पोलिसांत तक्रार
शुक्रवारी उपचारांनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
डॉक्टरलाही केली होती जय श्रीरामची सक्ती
काही दिवसांपुर्वी कनॉट प्लेस येथे हनुमान मंदिराजवळ पुण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरलाही जय श्रीराम म्हणण्याची सक्ती अज्ञातांनी केली होती.