बहुजननामा ऑनलाईन – टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीही आज ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी धोनी लडाखला पोहोचला आहे. लडाखमध्ये त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. धोनी लडाखला पोहचला तेव्हा सैन्य अधिकार्यांनी त्याचे अभिवादन केले आणि त्याच्याशी संवाद साधला. आर्मी ड्रेसमध्ये धोनी लडाखला पोहचल्यावर धोनीचा उत्साह दिसून आला. तेथे त्यानी आर्मी जनरल रुग्णालयात भेट दिली आणि तेथील रूग्णांची भेट घेतली आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तेथील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात धोनी सैनिकांसमवेत बोलतांना दिसतो आहे. असे सांगितले जात आहे की, लडाखवरुन धोनी सियाचिनला देखील जाणार आहे. तिथे तो सियाचीन बॅटल स्कूलमध्येही जाईल.
या भागातील उंच असणाऱ्या ठिकाणी जवान कशाप्रकारे ट्रैनिंग घेत असतील आणि कशा परिस्थिती राहत असतील या गोष्टीचा धोनी आढावा घेणार आहे. या दौऱ्यावेळी धोनी सियाचिन युद्ध स्मारकवर देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये १५ दिवसांच्या प्रशिक्षणावर तैनात आहेत. लेफ्टनंट कर्नल एमएस धोनीचे हे प्रशिक्षण गुरुवारी (१५ऑगस्ट) पूर्ण होत आहे.