बहुजननामा ऑनलाईन – आज देशभरात ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावर भाषण करतांना काही महत्वाच्या घोषणा केल्या. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहन पार पडले. पार पडले. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील काही राज्यात आलेल्या महापूरावर तसेच वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत लक्ष वेधले. पंतप्रधान मोदींनी संदेश दिला की, छोटे कुटूंब म्हणजे देशभक्ती आहे.
लोकसंख्या वाढीवर बोलतांना ते म्हणाले की, देशात लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. परंतू लोक या विषयावर पाऊल ठेवून विचार करत आहेत आणि छोट्या कुटूंबचा फायदा घेत आहेत, त्यांना आज सन्मानित करण्याची गरज आहे. छोटे कुटूंब म्हणजे एक प्रकारे देशभक्तीच आहे. मुलाला जन्म देण्याआधी विचार करायला हवा की काय आपण यासाठी तयार आहे, मुलांच्या गरजा पूर्ण करण्यास आपण तयार आहेत. मोदी पुढे यावर म्हणाले की, छोट्या कुंटूंबामुळे देशाच्या विकासाला गती मिळत आहे.
Prime Minister Narendra Modi on #IndiaIndependenceDay: Population explosion in the country will create various problems for the coming generations. Those who follow the policy of small family also contribute to the development of the nation, it is also a form of patriotism. pic.twitter.com/i4MtqucqhK
— ANI (@ANI) August 15, 2019
राज्यातील पूरपरिस्थिती बाबत संवेदना व्यक्त
आज एकीकडे देशात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत आणि दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
PM Narendra Modi in his address to the nation on 73rd #IndiaIndependenceDay: Today, when we are marking Independence Day, many of our citizens are suffering due to floods in various parts of the country. We stand in solidarity with those who are affected by the floods. pic.twitter.com/yGCKlL1MTS
— ANI (@ANI) August 15, 2019
जल जीवन मिशन
मोदींनी सांगितले की, देशातील प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले आवश्यक आहे. पाणी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जल जीवन मिशन घेऊन सरकार काम करत आहे. जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर सरकारचा भर आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जल जीवन मिशनवर ३.५ लाख कोटी रूपये खर्च करणार.