मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोने खरेदीवर तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. सोने खरेदी करायला जात असाल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक पर्याय आहे की, तुम्ही बिल घेऊन सोने खरेदी करा आणि दुसरा पर्याय बिल न घेता सोने खरेदी करा. दिल्लीत सराफ बाजारात ५ जुलैनंंतर ही पद्धत रुढ झाली आहे. याशिवाय दिल्लीतील सराफ व्यावसायिकांचा मते, इतर शहरात देखील तुम्ही ही पद्धत उपलब्ध असल्याचे पाहू शकतात. दुसरा पर्याय निवडलातर तुम्ही प्रति १० ग्राम मागे १५०० रुपयांचा फायदा मिळवू शकता. जर सोन्याची किंमत ३५,००० रुपये १० ग्राम असेल तर विना बिलाच्या खरेदीवर तुम्हाला ३३,५०० रुपये प्रति १० ग्राम किंमतीने सोने मिळेल. सराफ व्यवसायांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की ते त्यांच्या जुन्या आणि विश्वासू ज्वेलर्सकडून ते नेहमी सोने खरेदी करतात. त्यामुळे ते बिल घेण्याच्या फंद्यात पडत नाही.
सोन्यावर ३ टक्के जीएसटी –
व्यावसायिकांच्या मते, ५ जुलैला अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सोन्यावर आयात शुल्क १०.५ टक्क्यांवरुन वाढवून १२.५ टक्के करण्यात आला आहे. सोन्यावर ३ टक्के जीएसटी देखील लागतो. एक लाख रुपयांच्या खरेदीवर ५५०० रुपयांची बचत होईल. सराफ व्यावसायिकांच्या मते, आयात शुल्क वाढल्याने स्मगलिंगचे प्रकार वाढले आहेत. कारण एक किलोग्राम सोन्यावर २-२.५ लाखांची बचत होते. अनेक ग्राहक बऱ्याचवेळ एकाच दुकानातून सोने खरेदी करत असतात, तर ते देखील सराफांकडे बिना बिलाची सोन्याची खरेदी करतात.
१०० ग्राम सोन्यावर होईल १५००० रुपयांची बचत –
व्यावसायिकांच्या मते, सोन्यात आधिकृतपणे आयातीत कमी आली आहे, परंतु मागच्या दाराने मोठ्या प्रमाणात सोन्याचा सप्लाय होत असतो. कारण मागच्या दाराने येणाऱ्या सोन्यात आणि बिल घेऊन खरेदी केलेल्या सोन्यात मोठा फरक असतो. लग्न सणासुदीला ग्राहक ५० ते १०० ग्राम सोने खरेदी करतात, अशा वेळी १०० ग्राम सोने खरेदीवर ग्राहकांची १५,००० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.