बहुजननामा ऑनलाईन टीम – मॉब लिंचिंग मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिण्यात आलेल्या पात्रावर स्वाक्षरी करणारा अभिनेता कौशिक सेनला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सेन यांनी सांगितले की गुरुवारी त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
कौशिक सेनने सांगितले की, ”मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि असहिष्णुता विरुद्ध आवाज उठवणे बंद नाही केल्यास याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. मला सांगण्यात आले की माझी वागणूक नाही बदलण्यात आले तर माझी हत्या करण्यात येणार.”
चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता सहित ४९ प्रतिष्ठित व्यक्तींनी मंगळवारी पंतप्रधानांना पत्र लिहून देशात हिंसा आणि हत्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केले होते. या पत्रात कौशिक सेनचीही सही होती.