नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या अनेक केंद्रीय नेत्यांनी गाय आणि तिचे बाय प्रॉडक्ट्स वारपण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारने आता ही मोहिम पुढे नेण्याची जबाबदारी घेतली आहे. आता केंद्र सरकारकडून गायीचं शेण आणि गोमुत्रापासून उत्पादन करण्याचा व्यापार सुरु करण्यासाठी सरकारी निधी मिळू शकेल.
गोमुत्राचा आणि शेणाचा औषधी आणि शेतीविषयक कामांसाठी वापर
राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे चेअरमन म्हणाले, “डेअरीसोबतच गायीचं शेण आणि गोमुत्रापासून नवीन उत्पादने घेणाऱ्या स्टार्टअपसाठी प्रारंभिक गुंतवणुकीचा 60 टक्के सरकारी निधी मिळेल.” काऊ बोर्डचे चेअरमन वल्लभ कठेरिया यांच्या मते, तरुणांना गायी आणि तिच्या बाय प्रॉडक्ट्सवर आधारीत उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडून गायीचा वापर दूध आणि तुपासाठी नाही तर गोमुत्र आणि गायीच्या शेणाचा औषधी आणि शेतीविषयक कामांमध्ये वापर करण्यावर जोर दिला जाईल.
500 कोटींच्या सुरुवाती गुंतवणुकीसोबत कामधेनू आयोगाची सुरुवात
टीओईच्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी सरकारने याच वर्षी फेब्रुवारीत 500 कोटींच्या सुरुवाती गुंतवणुकीसोबत कामधेनू आयोगाची सुरुवात केली होती. त्यांचा हेतू या प्रकारच्या नव्या व्यवसायांना गती देणं हा आहे. कठेरिया म्हणाले, “ते गायीच्या बाय प्रॉडक्ट्सचा औषधी वापर करण्याबाबत केल्या जाणाऱ्या रिसर्चला प्रोत्साहित करण्याचं काम करतील. बोर्ड अशा बाय प्रॉडक्ट्ससाटी स्कॉलर्स आणि रिसचर्सना आपला प्रोजेक्ट दाखवण्यासाठी एक मंचही देईल.”
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ