नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित NDA सरकारने भरघोस यश मिळवल्यानंतर आता भाजप सरकार वेगाने कामाला लागले असून येणाऱ्या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मोदी सरकार देणार असून स्वस्त दरात घर मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पात गृहकर्ज घेणाऱ्या नागरिकांना सूट देण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे रियल एस्टेट सेक्टरला मंदीतून बाहेर काढण्यासाठी देखील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने माहिती मागवली असून यामधे टॅक्समध्ये कशाप्रकारे सूट देता येईल याचा देखील विचार अर्थ मंत्रालय करत आहे.
मोदी सरकारने लागू केलेल्या रेरा कायद्यामुळे रियल एस्टेट सेक्टरमध्ये मंदी निर्माण झाली होती. त्यामुळे रियल एस्टेट सेक्टरला मंदीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात टॅक्सवर सूट देण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे आता आगामी अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार काय पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.