नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपप्रणीत NDA सरकारमध्ये नुकतेच केंद्रीयमंत्री पदाची शपथ घेतलेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी बंडखोरी करत नवीन पक्ष स्थापन केला आहे.लोक जनशक्ती पक्षातील घराणेशाहीला कंटाळून हे पाऊल उचलत नवीन पक्ष स्थापन केल्याचे म्हंटले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टीने बिहारमध्ये सहा जागा जिंकल्या होत्या. पार्टीचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा म्हणाले की, पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा देत नवीन पक्षाची स्थापना केली आहे. लोक जनशक्ती पार्टी धर्मनिरपेक्ष असं या पक्षाचं नाव आहे. यामध्ये सत्यानंद शर्मा देखील सामील आहेत.लोक जनशक्ती पार्टी चे रामविलास पासवान यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
पक्षातील राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा यांच्यासह पक्षातील ११६ पदाधिकाऱ्यांनी लोक जनशक्ती पार्टी ला रामराम ठोकला आहे. सत्यानंद शर्मा यांनी पक्षावर जोरदार आरोप करत. लोक जनशक्ती पार्टीत कौटुंबिक वाद आणि भ्रष्टाचार वाढला असून पैसे घेऊन पक्षाकडून तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.