पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात बिबवेवाडी येथे ‘खड्यात रस्ता आहे कि रस्त्यात खड्डा’ हाच प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडला असेल नेमकी हाच मुद्दा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अनाेखे आंदाेलन करण्यात आले. या भागातील ड्रेनेजचे काम दाेन दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले हाेते. त्यानंतर रस्ता डांबर टाकून पुर्ववत करण्यात आला हाेता.मान्सूनला आता कुठे सुरवात होत असून पहिल्याच पावसात हा रस्ता खचल्याने महापालिकेचा ढिसाळ कारभार समाेर आला आहे. त्यामुळे या विराेधात मनसे स्टाईल आंदाेलन करण्यात आले.
बिबवेवाडी मागील चार महिन्यांपासून सुरु असलेले ड्रेनेजचे काम नेमकेच पूर्ण करण्यात आले. परंतु पुण्यात दाेन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात हा रस्ता खचला. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही. पण या ठिकाणपासून काही अंतरावर विद्या निकेतन शाळा आहे .यामुळे जर कुठली दुर्घटना घडली असती. तर या गोष्टीला जबाबदार काेण असा सवाल मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. अधिकारी वर्ग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.हा रहदारीचा रस्ता खचल्यानंतर पालिकेचा कुठलाही अधिकारी घटनेच्या ठिकाणी फिरकला नसल्याचे मनसे कडून सांगण्यात आले आहे.
यावेळी रस्त्याच्या बाजूला सर्वाेत्कृष्ट कामाचा सर्वाेत्कृष्ट खड्डा असे लिहीलेला फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आला असून खचलेल्या डांबराला हार देखील घालण्यात आला आहे. यानंतर महानगरपालिकेचे पदाधिकारी काय पाऊल उचलतात हे बघणे महत्वाचे असेल.