जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – MLA Rohit Pawar | CCC चे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपचे (BJP) नेते गिरिश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कोणतीही निवडणूक आली की फोडाफोडीचे राजकारण गिरीश महाजन अगोदर करत असतात. असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. त्यावेळी ते आज (शुक्रवारी) जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार हे आज जळगाव येथील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्या दरम्यान बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोणतीही निवडणूक आली की फोडाफोडीचे राजकारण गिरीश महाजन अगोदर करत असतात. पैशांच्या ताकदीचे घमंड असल्यानेच ते करत आहेत. त्याचा वापर मतदान काळात केला जात असल्याने एकप्रकारे लोकशाहीला तडा जातो. परंतु, लढत ही लोकशाहीच्या माध्यमातून झाली तर खरी ताकद जनतेसमोर येईल. असा हल्लाबोल त्यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ED ची चौकशी महाराष्ट्रातच नाही, तर बाहेरच्या राज्यात देखील कारवाई सुरू आहे. हे लोकशाहीला सोडून असून सुडाचे राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच चौकशीवर ED काहीच बोलत नसून भाजपचे काही नेते समोर येवून चौकशीबाबत ईडीचा पुरावे दिल्याचे बोलत आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे मोठे नेते आहेत. भाजपमध्ये असताना तेव्हाच त्यांची ताकद कमी करण्याचे काम भाजपमधील काही नेत्यांनी केले.
असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Web Title : MLA Rohit Pawar | mla rohit pawar target bjp leader and former minister girish mahajan boasts of money
PIB Fact Check | मोदी सरकार नव्या योजनेंतर्गत नागरीकांना देणार 4000 रुपये? जाणून घ्या सत्य
Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल
Monsoon In India | मान्सूनच्या परतीचा प्रवास रखडला ! 8 दिवसांपासून ‘जैसे थे’ स्थिती
Mutual Fund | या दिवाळीत आपल्या मुलांना द्या म्युच्युअल फंडची भेट, 20 वर्षात होईल करोडपती