Monsoon In India | मान्सूनच्या परतीचा प्रवास रखडला ! 8 दिवसांपासून ‘जैसे थे’ स्थिती
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून उत्र आणि दक्षिण भारतात मान्सूनच्या (Monsoon in India ) पावसाने थैमान घातले आहे. देशातील निम्म्याहून अधिक भागातून मान्सून परतला असला तरी बऱ्याच राज्यात मान्सूनचा (Monsoon in India) मुक्काम वाढला आहे. यापुढे काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात मानसूनच्या जोरादर सरी (Heavy rainfall) कोसळणार आहेत. मागील आठ दिवसांपासून देशात नैऋत्य मोसमी वाऱ्याची (Southwest monsoon winds) स्थिती जैसे थे असल्याने पुढील काही दिवस तरी देशात मान्सूनच्या सरी कोसणार आहेत.
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सूनची वापसी होणार आहे. 1975 नंतर देशात पहिल्यांदाच इतके दिवस मान्सून थांबला आहे. वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतला असला तरी अद्याप काही राज्यात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय आहेत. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधून (Rajasthan) मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
22 Oct 2021 SW Monsoon Withdrawal Updates:
No change in the position of SW Monsoon withdrawal line since 14 Oct 2021. pic.twitter.com/5k9NPvbP41— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 22, 2021
परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा अॅक्टिव्ह झाला. याचा दुहेरी प्रभाव मान्सूनवर पडला आहे. त्यामुळे देशात मान्सून (Monsoon in India ) रखडला आहे. सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) काही भागात आणि दक्षिण-ईशान्य भारतात मान्सून अडकला आहे. मागील 8 दिवसांपासून मान्सूनच्या वाऱ्याची हीच स्थिती कायम आहे. त्यामुळे देशातील मान्सूनचा मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे.
महाराष्ट्राती पावसाची उघडीप
महाराष्ट्रात पावसाने (Rains in Maharashtra) पूर्णपणे उघडीप घेतली आहे. मागील आठवड्यापासून राज्यात कोणत्याही भागात पावसाचा इशारा देण्यात आला नाही. तसेच आजपासून पुढील 5 दिवस राज्यात कोरड्या हवामानाची (dry weather) शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. परंतु याची शक्यता फारच कमी आहे. तर पुण्यात (Pune) तीन दिवसांनंतर हवामान खात्याने ढगाळ हवामानाची नोंद केली आहे. पुण्यात कमला 32.2 तर किमान 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Web Title : monsoon in india india monsoon update in india weather forecast in maharashtra today imd reports
Mutual Fund | या दिवाळीत आपल्या मुलांना द्या म्युच्युअल फंडची भेट, 20 वर्षात होईल करोडपती
Comments are closed.