पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 91 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 113 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 3 हजार 639 इतके कोरोना (Pune Corona) बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 93 हजार 610 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9069 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 960 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 960 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 160 रुग्ण गंभीर आहेत. तर 148 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5763 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लाख 06 हजार 310 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title :- Pune Corona | Comfortable! 113 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics
Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल
Monsoon In India | मान्सूनच्या परतीचा प्रवास रखडला ! 8 दिवसांपासून ‘जैसे थे’ स्थिती