मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विचारवंतांच्या हत्या प्रकरणात सनातचनचा हात असल्याचे मी बोललो होतो. त्यामुळे मलाही मारण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु सुदैवाने मी बचावलो. विचारवंतांच्या हत्या प्रकरणातील कळसकर आणि अंदूरे हे तर प्यादे आहेत. या सनातन्यांचे खरे मारेकरी बाप शोधा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
शरद कळसकर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरला सीबीआयने अटक केली. त्याची सीबीआयने वैद्यकिय चाचणी घेतली. तेव्हा दाभोलकर यांच्यावर मी आणि सचिन अंदूरेने गोळ्या झाडल्या असल्याचे कबूल केले. त्यानंतर सनातनचे वकिल अॅड. संजीव पुनावळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली. पुनाळेकर यांनी त्याला पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला दिला. असे त्याने सांगितले आहे. त्यानंतर काल न्यायालयात सीबीआयने अहवाल सादर केला त्यात सचिन अंदूरे आणि शरद कळसकरने गोळ्या झाडल्याची कबूली दिली. असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले.
यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली . त्यावेळी ते म्हणाले की मी आधीच म्हटले हेते, की डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये शरद कळसकर आणि अंदूरे हे दोघे तर प्यादे आहेत तर सनातन्यांचे खरे मारेकरी शोधा असे जितेंद् आव्हाजड यांनी पाहिले.