नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी गायकांच्या यादीत मिका सिंग याचे नाव आवर्जून घेतले जाते. तो सोशल मीडिया वर देखील तितकाच ऍक्टिव्ह असतो. त्याचे गाणे आणि विडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. परंतु मिका याचा सध्या एक विडिओ फारच चर्चेत आहे. पण त्याच्या या व्हिडिओमुळे त्याचे चाहते त्यांच्यावर नाराज आहेत आणि नाराज असल्याचे कारण म्हणजे त्याने परफॉर्मन्स केलेली जागा . होय, मिका सिंग हा पाकिस्तानातील कराची मध्ये केलेल्या परफॉर्मन्स मुळे यूजर्स च्या रागाला बळी पडला आहे.
जम्मू-काश्मीर च्या मुद्द्यामुळे भारत आणि पाकिस्तान मधील वाद पेटला आहे. भारतानंतर पाकिस्तान नेदेखील भारतीय कलाकारांना प्रवेश बंद केला आहे. तरी मिका सिंग याचा कराची मधील हा कॉन्सर्ट चर्चेचा विषय ठरला आहे.
यावर पाकिस्तानी गायक याने मिका चा विडिओ ट्विट करत म्हंटले आहे कि, ” काश्मीरमध्ये पूर्णपणे आपत्तीजनक वातावरण आहे, परंतु हे असे गायक येतात , परफॉर्मन्स देतात , पैसे कमवतात आणि जातात , त्यांना काहीच फरक पडत नाही, असे दाखवतात जसे काही झालेच नाही, परंतु देशभक्ती आणि धर्म फक्त गरिबांसाठीच आहे. ”
मिका च्या या व्हिडिओवर पाकिस्तान च्या नामंकित पत्रकारनायला इनायत यांनी देखील ट्विट करणं लिहिले कि, “मी खूप खुश आहे कि, जनरल मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदी कार्यक्रमावेळी मिका हे परफॉर्मन्स करताना दिसले, मिळालेल्या माहितीनुसार मिका हे गेले तीन दिवस पाकिस्तान टूरवर आहेत. ”
मिका सिंग च्या या विडिओमुळे त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज आहेत. यूजर्स ने त्याला ‘लाज वाटत नाही का ?’ अश्या शब्दात टीका केली आहे. तर एका यूजर्स ने लिहिले कि ‘वेळ खराब आहे , पण इतकी पण नाही कि तिथे जाऊन परफॉर्मन्स करावा लागेल. ‘
मिका सिंग बरोबर पाकिस्तानच्या लोकांनी इमरान खान याला देखील धारेवर धरले आहे. मिका पाकिस्तान मध्ये आलाच कसा? बॅन फक्त गरिबांसाठी आहे का? रिपोर्ट च्या नुसार पाकिस्तनामध्ये १४ लोकांना वीजा मंजूर झाला आहे. त्याची एक कॉपी देखील सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
जम्मू – काश्मीर मुद्द्यावर भारत सरकारने घेतलेल्यां निर्णयाला पाकिस्तान ने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पाकिस्तान ने भारताच्या वस्तू , समझोता एक्सप्रेस तसेच भारतीय कलाकारांदेखील पाकिस्तानात बंदी केली आहे. भारतीय चित्रपटांनादेखील बॅन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे भारतीयांत निर्मात्यांनी देखील पाकिस्तानमध्ये चित्रपट प्रदर्शित करणार नाही तसेच पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.