बहुजननामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन तरुणीने स्वतःवर अॅसिड ओतून पेटवुन घेतलं आहे. या तरुणीचे वय १५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आत्महत्या केलेल्या तरुणीचे एका २२ वर्षाच्या तरुणावर प्रेम होते. यात आणखीन एक बाब समोर आली आहे ती म्हणजे प्रेयसीने आग लावून घेतल्याचे समजताच प्रियकरानेही स्वतःला आग लावून घेतले.
यावेळी ग्रामस्थांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत प्रियसीचा मृत्यू झाला होता तर प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे. प्रियकराला उपचारासाठी दिल्लीतील सफरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याघटनेबद्दल अधिक माहिती गोवर्धनचे पोलीस उपनिरीक्षक वरुण कुमार यांनी सांगितले की, एका १५ वर्षीय तरुणीने गोवर्धन परिसरात राहत्या घरात स्वतःवर अॅसिड ओतून घरात आग लावून घेतली. घरा बाहेरून धूर येताना शेजाऱ्यांनी पहिला तेव्हा त्यांचा गोंधळ उडाला. तिला वाचवण्याचा गावकर्यांनी प्रयत्न केला पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही घटना प्रियकराला समजताच त्यानेही स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटना स्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. परिसरात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या घटनेचा कसून तपास करत आहेत.
Visit : bahujannama.com