बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरु आहे. पितृपक्षानंतर सणासुदीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवरात्रीचा सण सुरु झाला आहे. आता दसरा दिवाळी काही दिवसांवरच आहे. सोन्याचा दर पितृपक्षाकत चांगला ढासळला होता. परंतु आता येणाऱ्या सणांमध्ये नेहमीप्रमाणे सोन्यामध्ये चांगली तेजी येण्याची शक्यता आहे. तर आता अनेकांनी सोन्याचे बुकींग केले आहे आणि हे केलेले बुकिंग धनत्रेयदशीच्या दिवशी त्याची डिलिव्हरी घेणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आता सोने खरेदीचे बुकींग केले तर शुभमुहूर्तावर त्याची डिलिव्हरी होऊ शकते.
अमेरिकेतील डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये बराच फरक पडताना दिसत आहे. या संपूर्ण आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने एका आठवड्यात १,५०० डॉलर प्रति तोळा वरून खाली पडले आहे.
मजबूत झाला डॉलर
अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि त्यामागील फायदा जास्त झाल्यामुळे त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरात दिसून आले. या घटनांमुळे अनेक जणांचे म्हणणे आहे सण उत्सव सुरू होण्याआधी सोन्या मध्ये घसरण झाल्याने सोने खरेदीत वाढ होणार आहे
चांदी मध्ये देखील झाली घसरण
चांदीची किंमत डिसेंबरच्या करारामध्ये २. ३४ टक्क्यांनी घटून प्रति ग्रॅम १७. ४९ डॉलरवर इतकी होती. याबद्दलची माहिती देताना केडिया कमोडीटीचे संचालक अजय केडिया म्हणाले, सोन्याचांदीचा मोठे खरिदार चीन आहे आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला चीन मध्ये पाच दिवसांची सुट्टी असेल ज्यामुळे सोन्या चांदीची नफा बुकींग दिसून येत आहे.
चीन ,अमेरिका मधील सामंजस्यता
व्यापार सुधरवण्यासाठी अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये नवीन संबंधांना पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. यामुळे स्टॉक बाजारात पुन्हा तेजी आली आहे. शेअर वाढीमुळे सोना चांदी कडे गुंतवणूकदारांचा कल कमजोर झाला आहे.
सणासुदीचा सीझन
शनिवारी पितृपक्ष संपला असून रविवारपासून नवरात्रास सुरुवात झाली आहे. यामुळे आता सणासुदीच्या काळामध्ये सोन्याचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे.
Visit : Bahujannama.com