मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पदव्युत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमांतील प्रेवशाचा तिढा न सुटल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. मराठा समाजातील विद्यार्थी थोड्याच वेळात आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आला होता . या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पाडणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तिढा अखेर सुटला आहे. मराठा आरक्षणांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार असल्याचं जाहीर केलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम आहे. या शैक्षणिक सवलतींबाबत विचार करण्यासाठी उद्या मराठा मोर्चाची बैठक शिवाजी मंदिरात पार पडणार आहे.