श्रीनगर : वृत्तसंस्था – लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात सुरु केलेल्या आक्रमक मोहिम अधिकच तिव्र करण्यात आली आहे. काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील नागनाद चिम्मेर परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दशहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर लष्कराने परिसरात शोध मोहिम राबवली असून चकमक अद्यापही सुरुच आहे.
कुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेराव घालून शोध घेण्यात आला. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. यानंतर आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. दरम्यान, यापरिसरातील चकमक आणि शोध मोहीम अद्याप सुरुच आहे.
#UPDATE: One unidentified terrorist killed in Kulgam encounter. Operation going on. Further details shall follow: Kashmir Zone Police https://t.co/ZWxkByxbUf
— ANI (@ANI) July 17, 2020
यापूर्वी काल काश्मिरमधील कुपवाडा परिसरातील लष्कराने नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता. यादरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. कुपवाडामधील केरन येथे नियंत्रण रेषेच्या पलीकडे काही जण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले होते. यानंतर त्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.