थुट्टुकुडी : वृत्तसंस्था – चॅनल बदलायला सांगितल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीची संतापाच्या भरात गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना तमिळनाडू राज्यातील सथंकुलम शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शेजारी टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या 7 वर्षांच्या चिमुकलीला लावलेला चॅनल आवडला नाही. त्यामुळे चॅनल बदलण्यासाठी ती हट्ट करू लागली. चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी करू लागली. संतापलेल्या शेजार्याने चिमुकलीचा गळा दाबून खून केला. यापूर्वी अनेकदा या शेजार्याचा चिमुकलीच्या वडिलांसोबत वाद झाला होता. आपण काय केले हे भानावर येईपर्यंत चिमुकलीने प्राण सोडला होता. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने चिमुकलीचा मृतदेह पिंपात लपवून त्यामध्ये कचरा टाकला. पिंपाची विल्हेवाट लावताना एका व्यक्तीला हे पिंप दिसल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.