Corona in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11141 नवीन रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना महामारी पुन्हा आपले डोके वर काढताना पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात दहा हजारांच्यावर कोरोना बाधितांची नोंद होत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मागील पाच महिन्यानंतर पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्यावर गेली. राज्यात गेल्या 24 तासामध्ये 11 हजार 141 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
Maharashtra reports 11,141 new #COVID19 cases, 6,013 discharges, and 38 deaths in the last 24 hours
Total cases: 22,19,727
Total recoveries: 20,68,044
Death toll: 52,478
Active cases: 97,983 pic.twitter.com/rsTwpWKDxS— ANI (@ANI) March 7, 2021
आज राज्यात 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजार 478 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 2.36 टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात 6 हजार 013 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 20 लाख 68 हजार 044 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.17 टक्के इतके झाले आहे.
सध्या राज्यात 97 हजार 983 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 68 लाख 67 हजार 286 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 22 लाख 19 हजार 727 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.16 टक्के इतके आहे. सध्या 4 लाख 39 हजार 055 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर 4 हजार 650 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Comments are closed.