बहुजननामा ऑनलाइन टीम – 2016 मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतलेल्या अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे. मिथून चक्रवर्ती रविवारी (दि. 7) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केलेल्या कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावरील व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. कुणी जर हिसकावून घेत असेल तर मी त्यांच्या हक्कासाठी उभा राहिन. मी बंगाली असून जो कुणी इथे वाढला आहे. त्याचा या भूमीवर अधिकार आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेन असे सांगत त्यांनी मी कोब्रा असून माझा एक दंशही पुरेसा असल्याचा इशारा दिला.
I once dreamt of doing something big in life but I never dreamt of being on a platform where such big leaders and the leader of the biggest democracy, Prime Minister Narendra Modi ji will be present: BJP leader Mithun Chakraborty at Brigade Parade Ground in Kolkata pic.twitter.com/72zTKuGfr2
— ANI (@ANI) March 7, 2021
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, मी मूळचा उत्तर कोलकातातील जोराबागन या एका छोट्या भागातील आहे. माझ एक स्वप्न होते की, खूप मोठ व्हावे. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासारख्या देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून मिथून चक्रवर्ती हे पुन्हा राजकारणात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीनंतर या चर्चेला अधिक बळ मिळाले होते. अखेर त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. 2010 मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. पण ते राजकारणात फार काळ रमले नाहीत. त्यांनी 2016 मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.