मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र क्रांती सेना या घटक पक्षाने लेखी देत भाजपकडे 10 जागांची मागणी केली आहे. पक्षाच्या वतीने काल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी देण्यात आलं आहे. पक्ष प्रमुख सुरेश पाटील, भारत पाटील, सुशांत पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भाजप-शिवसेनेचा घटक पक्ष असलेला महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष मराठा समाजाच्या प्रश्नावर लढण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याची हमी देखील दिली होती.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या हमीनंतर महाराष्ट्र क्रांती सेनेचे पक्ष प्रमुख सुरेश पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. सुरेश पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चानंतर या पक्षाची स्थापना केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या या पक्षातर्फे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचेही जाहीर करण्यात आले होते. यानंतर पक्षाने आता 10 जागांची मागणी केली आहे.
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा