कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – अॅप्पलने आयफोनचे तीन नवीन मॉडेल iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max लाँच केले आहेत. यावेळी कंपनीने फोनच्या सुरुवातीच्या किंमतीत कपात केली आहे. iPhone 11 ची किंमत 699 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय किंमत जवळपास 50228 रुपये ठेवली आहे. कंपनीने सर्वाधिक किंमत iPhone 11 Pro Maxची ठेवली आहे. ही किंमत 1099 अमेरिकन डॉलर म्हणजेच 78971 रुपये आहे. भारतात हा फोन 20 सप्टेंबरपासून खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची प्रीबुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
iPhone 11 ची किंमत आणि फीचर्स
Phone 11 ची किंमत 699 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय किंमत जवळपास 50228 रुपये आहेत. याचे फीचर्स पुढीलप्रमाणे-
– 6.1 इंच लिक्विड रेटीना डिस्प्ले
– 6 रंगात फोन उपलब्ध
– नाईड मोडची सुविधा ज्यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लीक करू शकता
– ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये वाईड अँगल लेंस जी 120 डिग्री फील्ड व्ह्युचे फोटो क्लीक करण्यास सक्षम
– कंपनीच्या मते याचा बॅटरी बॅकअप आयफोन XRच्या तुलनेत एक तास जास्त आहे.
iPhone 11 Pro किंमत आणि फीचर्स
या फोनची किंमत 999 अमेरिकन डॉलर म्हणजेच 71786 रुपये ठेवण्यात आली आहे. याचे फीचर्स पुढीलप्रमाणे-
– ट्रीपल रिअर कॅमेरा सेटअप
– 5.8 इंच स्क्रीन
– सुपर रेटीना डिस्प्ले
-4K व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य
iPhone 11 Pro Max किंमत आणि फीचर्स
या फोनची किंमत 1099 अमेरिकन डॉलर म्हणजे 78971 रुपये ठेवण्यात आली आहे. याचे फीचर्स पुढीलप्रमाणे-
– 6.5 इंचाची सुपर रेटीना डिस्प्ले स्क्रीन
– जुन्या मॉडेलपेक्षा या फोनचा बॅटरी बॅकअप 4-5 तास अधिक.
– ट्रीपल रिअर कॅमेरा सेटअप
– 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य
– 12 MPचा वाईड अँगल कॅमेरा, एक 12 MPचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि एक टेलीफोटो कॅमेरा
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा