नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच लागू झालेल्या नवीन वाहतूक नियमांची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. परंतु यामुळे काहींसाठी नवीन व्यवसायाची संधीही उपलब्ध झाली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर हेल्मेटच्या मागणीत 5 टक्के वाढ झाली आहे. दुकानांवर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
विशेष बाब अशी की, पुरुष आणि महिलांच्या हेल्मेट व्यतिरीक्त लहान मुलांचे हेल्मेटही विकले जाताना दिसत आहेत. अनेकांनी तर हल्मेटचं नवीन दुकानच सुरू केलं आहे. इतकेच काय तर कपडे आणि किराणा दुकानातही हेल्मेट विक्री होताना दिसत आहे. परंतु हे हेल्मेट आयएसआय प्रमाणित नाहीत असे दिसत आहे. त्यामुळे हे सुरक्षित नाहीत. परंतु वाहतूक पोलिसांना चकवा देण्यासाठी आणि दंडापासून वाचण्यासाठी लोक या हेल्मेटची खरेदी करत आहेत.
पूसा रोड, करोलबाग व दरियागंज मध्ये घाऊक दुकानांव्यतिरिक्त नुकतेच जामा मस्जिद व चांदनी चौकसह इतर ठिकाणीही हेल्मेटची नवीन दुकाने उघडण्यात आली आहे. येथे इतर दिवसांच्या तुलनेत 20 ते 30 टक्के हेल्मेट विकले जाताना दिसतात तेदेखील अधिक किंमतीत.
चांदनी चौकातही काही कपड्याच्या दुकानात रंगीबेरंगी हेल्मेट लोकांना आकर्षित करत आहेत. हे हेल्मेट स्वस्त तर आहेतच शिवाय पोशाखांच्या रंगाशी देखील मॅच करतात. हेल्मेट विकणाऱ्या एका दुकानदाराने सांगितले की, कपड्याचा व्यवसाय मंदावत आहे. अचानक हेल्मेटची मागणी वाढल्याचे पाहिल्यानंतर त्याने हेल्मेट विकायला सुरुवात केली.
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा