कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र क्रांती सेना, बळीराजा पार्टी यांची संयुक्त दुसरी आघाडी स्थापना करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ३३ उमेदवारांची यादी सुरेश पाटील, पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
महाराष्ट्राची आजपर्यंतची वाटचाल पाहता ठरावीक घराण्यांपुरतेच राजकारण राहिले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा केवळ वापर करून फेकून देण्याचे काम केले जाते. मात्र, या आघाडीतून सर्वसमावेशक घटकातील लोकांना उमेदवारी देण्याचे काम केले आहे. सुजाण मतदारांसाठी दुसरी आघाडी योग्य पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र क्रांती सेना, बळीराजा पार्टीचे उमेदवार याप्रमाणे : हातकणंगले- सुरेश पाटील अथवा बी. जी. काका पाटील, कोल्हापूर- भरत पाटील, पै. किसन केरबा काटकर, सांगली- डॉ. उन्मेश देशमुख अथवा ऋषीकेश साळुंखे, सातारा- पंजाबराव पाटील, उस्मानाबाद- रामजीवन बोंदर, बारामती- गणेशकाका जगताप, माढा- संजय पाटील अथवा उमेश पाटील, लातूर- वैजनाथ पाटील, रायगड- संजय पाशीलकर, रत्नागिरी-सिंधुुर्ग- एस. टी. सावंत अथवा अशोक जाधव, भंडारा-गोंदिया- संजय ठोंबरे, नागपूर- खुशबू बेलेकर, चंद्रपूर- प्रदीप बोबडे, ठाणे- रवींद्र साळुंखे, उप. मुंबई- उल्हास पाटील, द-उ मुंबई- अक्षय सानप, कल्याण- धनराज शहा, जळगाव- वंदना पाटील, नाशिक- शरद शिंदे, बीड- ॲड. गणेश कारंडे, जालना- प्रा. पांडुरंग मांडळीकर, दिंडोरी- अभिजित गायकवाड, मावळ- ह.भ.प. संभाजी गुणाट महाराज, शिर्डी- पवन हिरे, उ.-पू. मुंबई अरुण कान्होरे, गडचिरोली- नंद नरोटे, वर्धा- ॲड. शीला ढगे, अकोला- डॉ. धनंजय नालट, बुलढाणा- संजय देशमुख, नांदेड- शिवानंद पांचाळ, पुणे- छायाताई नांदगुडे आदींचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील, दिगंबर लोहार, भरत पाटील, गणेशकाका जगताप, सुनीता पाटील, जयदीप शेळके, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.