बहुजननामा ऑनलाईन : विधानसभा निवडणूकच्या निकालानंतर बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेत राज्यात सत्तस्थापन करण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने सार्वमताने बुधवारी विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता असून यासंदर्भात आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे.
दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार असेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पण सत्तावाटपात भाजप आणि शिवसेना यांच्यात कोणाचा किती वाटा असेल याबाबत एकमत झाले नसून जोरदार चर्चा सुरु आहे. यंदा चांगल्या जागांचा आकडा मिळाल्याने शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलाची मागणी केली होती. मात्र दुसरीकडे पुन्हा ५ वर्ष मी मुख्यमंत्री राहणार असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे.
दरम्यान अश्या परिस्थितीत शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांचा विचार करता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातील एक उपमुख्यमंत्री भाजपचा तर एक शिवसेनेचा असेल, अशी माहिती मिळाली आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदासोबतच शिवसेनेकडून अधिक मंत्रीपदांची देखील मागणी केली जात आहे. त्यामुळे काही महत्त्वाची खात्यांबरोबर शिवसेनेला केंद्रात देखील अधिकचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसली तरी आज शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीनंतर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिवसेनेने आपल्या भूमिकेत नरमाई दाखवली, अशा पद्धतीच्या बातम्यांना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहे . तसेच सरकार स्थापन करण्याची काही घाई नसल्याचे स्पष्ट करत लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्यानुसारच होतील. असेही ते म्हणाले .
दरम्यान, २०१४ च्या तुलनेत भाजपला यंदा कमी जागा मिळाल्याने शिवसेना भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच ‘जे जे शक्य होईल ते सर्व करणार,’ असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळे जागावाटपावेळी केलेली तडजोड शिवसेना सत्ता स्थापन करताना खातेवाटपाबाबत करणार नाही, असे दिसत आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Visit : Bahujannama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जा