मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवणुकांचा जवळपास सर्वच मतदार संघातील निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमुले तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप लाट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर करत भाजप -शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षांतर केलेल्या जवळपास ३५ नेत्यांना महायुतीने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. परंतु या ३५ नेत्यांपैकी केवळ १६ उमेदवारांना विजय मिळाला असून १९ जणांच्या पदरी अपयश पडले आहे. त्यात भाजपमधील ८ तर शिवसेनेतील ११ उमेदवार पराभुत झाले आहेत.
भाजपमधील ८ पराभूत उमेदवार :
१) राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेलय वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला .
२) काँग्रेसमधून आलेले हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदार संघातून पराभव झाला .
३) काँग्रेसमधून आलेले गोपालदास अग्रवाल यांना गोंदिया जिल्ह्यातून उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचाही प्रभाव झाला आहे.
४) वंचित बहुजन आघाडीतून आलेले गोपीचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघातून धक्कादायक पराभव झाला आहे.
५) काँग्रेसमधून आलेले धैर्यशील कदम यांना यांना कराड उत्तर मधून उमेदवारी देण्यात आली होती , मात्र त्यांचा पराभव झाला आहे.
६) रमेश आडसकर यांचाही माजलगावातून पराभव झाला आहे.
७) भारत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
८) सर्वांचे लक्ष वेढलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत देखील उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे.
शिवसेनेचे ११ पराभूत उमेदवार :
१) जयदत्त क्षीरसागर त्यांचा बीड मतदार संघातून पराभव झाला आहे.
२) राष्ट्रवादीतून आलेल्या दिलीप सोपल यांचा बार्शी मतदार संघातून पराभव झाला आहे.
३) भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
४) शेखर गोरे यांचा माण -खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे.
५) राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघातून पराभव झाला आहे.
६) विजय पाटील यांचा वसई मतदार संघातून पराभव झाला आहे.
७) संजय कोकाटे माढा मतदारसंघातून पराभव झाला आहे.
८) दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघातून पराभव झाला आहे.
९) नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघातून पराभव झाला आहे.
१०) निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघतून पराभव झाला आहे.
११) तसेच माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचाही नालासोपारा मतदार संघातून पराभव झाला आहे.
Visit : bahujannama.com