पुणे (भोसरी): बहुजननामा ऑनलाईन – भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 279 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला आहे. भोसरी मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात होते.
या ठिकाणी 20 टेबलांवर मतमोजणी झाली. मतमोजणीच्या 21 फेर्या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच लांडगेंची आघाडी घेतली असून त्यांच्या मतांच्या जवळपास पोहचताना लांडे यांची चांगलीच दमछाक झाली. प्रत्येक फेरीअखेर लांडे हे लांडगेंच्या तुलनेत निम्म्या मताने मागे असल्याचे पहायला मिळाले.
Visit : bahujannama.com