अकोला : बहुजननामा ऑनलाईन – अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे.
म्हातारा तर मुळीच नाही. सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. भाजप सरकारने चक्क सैनिकांच्या शौर्याचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला. राजकीय स्वार्थासाठी काहीही करणारे भाजप सरकार नागरिकांबाबत किती गंभीर आहे, हे यातून दिसून येते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकूनदेखील त्याचे श्रेय घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारीमुळे सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे, असेही पवार म्हणाले.
Visit : bahujannama.com