बहुजननामा ऑनलाईन टीम – आता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र अद्यापही घोषणा झालेली नाही. हा उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. आता या निमित्ताने साताऱ्यातील भाजपमधील राजकारणाचाही जोरदार चर्चा होत आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक भाजपच्या सातारा जिह्यातील नेत्यांनाच एकत्रित नको होती. काही इच्छुक उमेदवाराचं मत होत की, उद्यनराजेंविरोधी जनमताचा आपल्याला फटका नको. याबाबत भाजप नेत्यांनी मतदारसंघनिहाय आकडेवारीही दिली होती. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह इतर इच्छुकही एकत्र निवडणुकीला तयार नव्हते. याबाबत अधिक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर भाजपमध्येच राजकारण रंगल्याचं दिसतं आहे.
साताऱ्यातील राजकारण आणि उदयनराजे भोसले :
उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीची साथ सोडली. यामुळे उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला. भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये उदयनराजेंनी विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही घ्यावी असा आग्रह धरला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली आहे. आता मात्र सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही. त्यामुळे उदयनराजें यांना आता धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंच्या विरोधात लढण्यास सज्ज
मात्र आता सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरी राष्ट्रवादीतून ४ दिग्गजांची नावे आतापासूनच उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव हा राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आहे. त्यामुळे उद्यनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राष्ट्रवादी कडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांचेही नाव चर्चेत आहेत.
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा