नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सोमवारीही घसरण झाली असून मागच्या दिवसात क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात घट होत आहे. दिल्लीसह देशातील अनेक महानगरात सोमवारी हे दोन्हीही उत्पादन स्वस्त मिळत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलचा भाव ७० रु. लिटरवर आला आहे. दिलीत सोमवारी पेट्रोलमध्ये १६ पैशांनी घट झाली असून त्यामुळे पेट्रोल ६९.५९ रु. प्रति लिटर विकले जात होते. तर दुसरीकडे डिझेलमध्ये सोमवारी १५ पैशांनी घट झाली असून ६२.२९ रु. प्रति लिटर विकले जात आहे.
कोलकत्यातही सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर खाली आले आहेत. तिथे सोमवारी पेट्रोलच्या भावात १६ पैशांनी घट झाली असून ७२.२९ रु. प्रति लिटरवर आले होते आणि डिझेलचा भाव १५ पैशांनी खाली येत ६४.५२ रु. प्रति लिटर विकले जात आहे. मायानगरी मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही खाली आल्या असून पेट्रोलचा दर १६ पैशांनी घसरून ७५.३० रु. प्रति लिटर झाला आहे. त्याचबरोबर डिझेलही १६ पैशांनी घसरून ६५.२१ रु. प्रति लिटरवर आहे.
चेन्नईमध्ये तर सोमवारी पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त होऊन ७२.२८ रु. प्रति लिटर मिळत आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर १६ पैशांनी कमी होत ६५.७१ रु. झाले आहे. दिल्लीच्या नोएडामध्ये सोमवारी पेट्रोल ७२.०३ रु. प्रति लिटर आणि डिझेल ६२.९६ रु. प्रति लिटर मिळत आहे. तर दुसरीकडे गुरुग्राममध्ये पेट्रोल ७०.२१ रु. प्रति लिटर आणि डिझेल ६२.०८ रु. मिळत आहे. याशिवाय जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोल ७३.३५ रु. प्रति लिटर आणि डिझेल ६७.१३ रु. प्रति लिटर मिळत आहे.