नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता कोरोना व्हायरसपासून कोणताही पोर्टफोलिओ वाचलेला नसून मागच्या आठवड्यात देशांतगर्त वायदा बाजारात सोन्याची किंमत ४ हजार प्रति १० ग्रामने घटले आहे. शेअर बाजारात मागच्या काही आठवड्यात उतार-चढाव होत असताना गुंतवणूकदारांनी आपला मार्जिन कॉल पूर्ण करण्यासाठी सोन्याची बिकवाली वाढवली असून त्यामुळे पिवळ्या धातूची चमक कमी झाली आणि देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचा भाव साप्ताहिक आधारावर तब्बल ४ हजार रु. प्रति १० ग्राम झाले. सोन्यासह चांदीच्याही भावात घट नोंदवली गेली आहे. या आठवड्यात महागड्या धातूवर दबाव राहण्याची शक्यता आहे.
का झाली घट ?
कोरोना व्हायरसमुळे बाजारात अधिक भीती आहे. त्यामुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यासारख्या मालमत्तेमध्येही लोकं विक्री करत नफा कमवत आहेत, जेणेकरून बाकी ठिकाणाहून होणारी नुकसान भरपाई होईल. केडिया एडवायजरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, मागच्या आठवड्यात शेअर बाजारात मोठया प्रमाणात घट झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपले मार्जिन कॉल पूर्ण करण्यासाठी सोन्यामध्ये विक्री केली कारण अशावेळी सोने सर्वात सोपे साधन आहे, जे विकून रोख रक्कम मिळते. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी सोन्याचा एप्रिल अनुबंध मागच्या सत्रात १,७९० रु. म्हणजे ४.२४ टक्के खाली येत ४०,४१६ रु. प्रति १० ग्रामवर बंद झाले. व्यापारादरम्यान सोन्याचा भाव ४०,०५५ रु. प्रति १० ग्राम झाले. याच्या एक आठवडा अगोदर शेवटच्या सत्रात सोन्याचा भाव ४४,३५३ रु. प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. देशांतर्गत बाजारात शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्यावर दबाव आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव यावर्षी खालच्या स्तरावर आला आहे. मागच्या आठवड्यात कॉमेक्सवर सोने जवळजवळ २०० डॉलर प्रति औस घसरले. कॉमेक्सवर नऊ मार्चला सोन्याचा एप्रिल अनुबंध १,७०४ डॉलर प्रति औसपर्यंत झाला, जो यावर्षी सर्वात उंच स्तरावर आहे. जिथून भाव घसरून शुक्रवारी १,५०४ डॉलर प्रति औसपर्यंत खाली आला.
५५ हजार रु.पर्यंत पोहोचेल सोने
तज्ञांच्या मते, काही महिन्यांकरिता सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम ४१ ते ४५ हजार रु.पर्यंत टिकू शकतात. पण पुढील दोन वर्षांत ते प्रति १० ग्रॅम ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे दोन वर्षांत २५ टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळू शकते. जेव्हा शेअर बाजारात आपत्ती येते तेव्हा सोनं अधिक चमकतं. २००८ च्या जागतिक मंदीच्या काळात सोन्यात चांगली वाढ झाली होती. गेल्या एका वर्षात सोन्याचे दरही १२ टक्क्यांच्या आसपास रिटर्न मिळाले आहेत.
काय करणार गुंतवणूकदार ?
तज्ञ म्हणतात की, आपल्या पोर्टफोलिओमध्ये कमीतकमी २० टक्के सोने असले पाहिजे. ते कोणत्याही स्वरुपात म्हणजे गोल्ड कॉईन, ईटीएफ किंवा बाँड असो. जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोने कमी असेल तर आपण या घटच्या काळात खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओमधील प्रमाण वाढवू शकता. परंतु जर सोने ४४-४५ हजार रु. वर आले, तर आपण काही सोन्याची विक्री करुन शेअर्स खरेदी करू शकता आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्रकारे बॅलन्स ठेवू शकता.