नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस अनके व्हायरस प्रकारांचा समूह आहे, जो सस्तनधारी आणि पक्षांमध्ये रोगाचे कारण आहेत. हे आरएनए व्हायरस आहेत. माणसांमध्ये श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे होते, जे जास्त करून मध्यम परंतु कधीकधी प्राणघातक असतात. हे अतिसार गाय, डुक्कर आणि कोंबड्यांमध्ये वरच्या श्वसनमार्गाच्या रोगांमुळे होते.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला घेरले असून या व्हायरसची गती इतकी आहे कि अनेक लोकं त्याने संक्रमित झाले आहे. एवढेच नाही तर अनेकांचा मृत्यूही झाला आहे. सध्यातरी देशात आपल्या लोकांना या व्हायरसच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता उत्तर कोरियामध्येही कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण समोर आले असून स्पष्टपणे सांगायचे तर उ. कोरियामध्येही एका व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे माहित झाले आहे.
या रुग्णाबाबत उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी एक आदेश दिला असून तो खूपच धक्कादायक आहे. एका वृत्तसंस्थेनुसार उ. कोरियामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर किम जोंग यांनी धक्कादायक असे पाऊल उचलले आहे. किम जोंग यांनी आपल्या देशातील कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण मिळाल्यानंतर पीडित संशयिताला गोळी मारण्याचा आदेश दिला आहे.