दौंड बहुजननामा ऑनलाईन – केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट बाळासो शेंडगे यांची लहुजी शक्ति सेना महाराष्ट्र राज्याच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हाध्यक्ष कैलास सकट, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, दौंड तालुकाध्यक्ष विक्रम अडागळे यांच्या हस्ते पोपट शेंडगे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संघटनेची शाखा स्थापन करणार असून संघटनेच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करून समाजामध्ये शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी इत्यादी विषयांवर जोर देणार असून समाज एकीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पोपट शेंडगे यांनी व्यक्त केले.
भीमा पाटस कारखाण्याचे माजी संचालक किरण देशमुख, केडगावचे सरपंच अजित शेलार, माजी उपसरपंच विठ्ठल शेंडगे,ग्राप सदस्य अशोक उर्फ पिंटू शेंडगे, नागेश गोरगल,अशपाक शेख, रज्जाक इनामदार, जहांगीर शेख या मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.